Monday, April 27, 2009

साधी माणसे

रविवार संध्याकाळ .. असाच बाहेर गेलो होतो, तसा आठावाडा भर मेस चा डब्बा खावुन messed up च व्ह्यायला होत, म्हनून एक दिवस तरी "change" म्हनून बाहेर जेवायला जायचे ठरले, तसे दर रविवारी बाहेर जायचा नियम च झाला आहे असे म्हणाले तरी हरकत नाही.. हां तर मुळ मुद्दा हा की मग बाहेर जायचे तर कुठे (आई ला जसा आज स्वयंपाक काय करू हा प्रश्न पडतो तसे मला आणि योगेश ला नेमके कुठे जायचे हा प्रश्न भेडसावत होता) सरड्याची झेप कुम्प्नापर्यंत on same line अनिकेत आणि योगेश ची FC रोड पर्यंत, स्टेशन च्या पुढे कैम्प मधे शिरन्याएवढे मोठे आम्ही कधीच झालो नाहीत (कदाचित ती MG रोड ची झगमग मनाला भुरळ नाही घालत) तरी सुद्धा आम्ही ठरवले स्वस्तात ल्या स्वस्तात Recession चा आदर करून काहीतरी पोटात टाकायचे आणि थोडी डोल्याना हिरवल प्राप्त करून द्यायची ह्या विचाराने आम्ही निघालो..
ही एवढी सगली मोठी प्रस्तावना ह्या साठीच की आम्ही एक दिवस बाहेर जायचे जरी म्हणाले तरी त्या मागे एवढा विचार असतो, आता लग्ना नंतर बायको रोज म्हणाली कुठे तरी जाउया तर कसे व्ह्यायचे हा विचार मना मधे आल्याशिवाय राहिला नाही.. शिवाय दर रविवार फार फार तर FC आणि त्याच्या पुढे JM ह्या पुढे जात नाही.. so बायको ला वाटायचे ह्या इसमाने लग्ना आधी अक्खी ५-६ वर्ष पुण्यात काढली तरी सुद्धा मेला अजुनही कॉलेज च्या पोरान प्रमाने FC JM करत फिरतो.. कधी तरी MG किंवा KP ला ने म्हनाव.. (खुप असे केविल्वाने विचार मनात येतात पण करणार कायखोटे नाहीये त्यात काही) आम्हाला नाही जमत कधी JM च्या पुढे जायला..
इथून च आमची "सधी माणसा" संकल्पना जन्माला आली आणि मग निरंजन ला जाऊं घरी परत येई पर्यंत दृढा होत गेली.. ते होण्यास करानिभुत होते ते रस्त्यात आम्हाला आलेले काही अनुभव..आमच्या कड़े आहे विक्टर ती सुद्धा आता अश्या गतीने जाते की कोणीही आताच ११ वी च्या क्लास मधे गेलेली सुनीता अनीता pleasure घेउन "why shud boys have all the fun" म्हनून आम्हाला मागे टाकेल.. सो जाले ही तसेच एक eliminator वाला त्याच्या भावी बायकोला (गर्लफ्रेंड हा प्रकार अजुनही रुचत नाही आम्हाला सो आम्ही "भावी बायको" होणार असेल व नसेल तरी असेच संबोधतो) घेउन पुढे निघून गेला... तेंवाच वाटले जमाना 3rd गियर वर आहे आणि आम्ही न्यूट्रल वर रहूँ गाड़ी हकत आहोत.. माज्या विक्टर ची घेताना असलेली डिक्की काढून मी तिला अपडेट केले एवढेच काय ते.. आणि तेहि करताना बाबन चे बोलने खाल्ले होते.. आता अश्या वेलेस eliminator घेउन मागे मुलीला बसवून नेनारया तरुनाचे कौतुक नाही वाटले तर नवल.. सो, साधी माणसे ह्या सदर खाली स्वतहाला घालून पुढच्या प्रवासास सुरुवात केलि..
काही दृश्य बघता बघता पोहचलो निरंजन ला.. नेहमी मला असे वाटते की माज्या dokyawar वर कोणीही यावे टिकली मारुनी जावे असे लिहिले आहे, कारन बस मधील conductor, दुकानातील काम करणारा आणि होटल मधील वेटर ह्यानी कधीच माज्या पहिल्या हाकेला "ओ" दिलेला नाहीये.. म्हणजे अहो पैसे आम्ही पण मोजतो न.. तरी सुद्धा तुसदे पण ज़ेलावा लागतो.. असो पण जाले तसेच माज्या नंतर आलेल्या ३ जनाना serve केल्यावर मला त्याने विचारले काय हवे नको ते.. असो.. साधी माणसे म्हणले की सहन शक्ति आलेच.. जेवण जाले आणि आम्ही गाड़ी तशीच पार्क करूँ रस्त्यावरून जा ये करत होतो.. तर बरिस्ता लागले, CCD लागले तेथील काफ़ी चे रेट बघून असे वाटले एक गरीब ह्या एक काफ़ी मधे ४ दिवसाचे दोन वेल चे जेवण करेल..परत एकदा असो.. आपण फक्त बघायचे आणि मते व्यक्त करायची.. साधी माणसे असण्याचे तीसरे उदहारण..
पण जेवण स्वस्तात जाले अपेक्षेपेक्षा.. आता उन्हाला आहे सो काही ठण्ड होऊं जावे म्हनून मोर्चा वलवला मस्तानी कड़े.. त्याला सांगितले एक हाफ butterscotch आणि एक हाफ Mango मस्तानी दे.. पण हाफ कॉन्सेप्ट नाहीये.. घ्यायची असेल तर फुल घ्या १/२ करूँ देतो असे म्हणाला.. काही बोलता आले नाही.. आता आमच्या जागी जर कोणी मोठा माणुस असता तर ह्यानी असे म्हणाले असते का.. पण ठीक आहे समजुन घेतले परत..शेवटी.. मस्तानी पोटात टाकुन आलो घरी आणि थोड़े विचार मंथन करत बसलो..
लक्षात आले की आईटी मधे काम करत असून आपली ही अवस्था आहे तर मग बाकि लोकांचे काय होत असेल जे फक्त गरजे पुरते कमाव्तात.. FC मधे जाणारे ते कॉलेज गोइंग बरिस्ता मधे काफ़ी घेण्या एवढा पैसा कुठून आणतात? आणि महागडी bike घेउन पेट्रोल जाल्नर्या मुलाकडे कुठून येतात अश्या bikes?
का असे होते की केवल MG रोड वर जाण्याला आणि तिथले ते महागडे कपडे घालून चार चाकी वाहनं मधे फिर्नार्य लोकाना बघायला नकोसे वाटते? का असे होते की पैसे कमावत असून सुद्धा ह्या लोकन सारखे रहायला आपल्याला जमात नाही.. उत्तर खुप वेल सापडले च नाही.. तेवा असे वाटले की असे तर नाही आपण कितीही जाले तरी जय वातावरण मधे वाढलो त्याला ज़ुगारून देऊ शकू नाही.. म्हनून च विचार आहेत एकदम साधे आणि रहानेही.. असेल आमच्या फ़ोन ची बिल्स आज हजाराच्या आसपास पण आमच्या क्रेडिट कार्ड चे बिल अजुनही शेकडो मधेच आहे.. आपल्या माणसाला भेटायला आम्ही कात्रज निगडी ला जाऊ पण खरेदी करायला कोपर्यावर च्या जय हिंद मधे सुद्धा जाणार नाही.. अवघड आहे थोड़े बाकीच्या लोकन सारखे वागने पण ठीक आहे.. काय waeet काय चांगले माहित नाही.. पण साधी माणसे असे म्हनून समाधान मात्र वाटते... बरे वाटते की त्या झग्मगाताचा आपल्याला लोभ नाही.. फक्त प्रश्न एवढाच आहे उद्या आपल्या मुलाना अशीच साधी ठेवता येइल का आपल्याला? काळ च उत्तर दें.. ह्याच विचारत झोप लागली.. आणि एका नवीन वीक ला सुरुवात झाली ..

7 comments:

  1. अवधूत गुप्ते - तोड्लास मित्रा ..अगदी जाम आवडला आपल्याला....म्हणजे कसे काय आणि कुठून सुचतात यार तुम्हाला असले काही...आम्ही म्हणजे चायला पोरी वगैरे पाहत बसलो पण हे असले काही जमले नाय बाबा आपल्याला कधी.... छान सॉलिड सुपर्ब....
    पल्लवी जोशी - जोरदार टाल्या अनिकेत साठी.....आणि अवधूत साठी पण पुन्हा एकदा जोरदार टाल्या......
    वैशाली (सगले वाक्य नाकात उच्चार करूनच वाचने) ... अनिकेत कसे वाटतय आता? मला तर न अगदी माझ्या कॉलेज चे दिवस आठवले..आम्ही पण असच मस्त धमाल करायचो ....माझी एक फ्रेंड आणि मी मस्त फिरायचो ....(आणि अजुन बर्याच काही गोष्टी) ....(आणि मग शेवटी )...आणि ब्लॉग तर काय मस्तच लिहिला आहे...ते म्हणजे आता आपल्या हाताचा असा मल झाला आहे ..हो ना?
    पल्लवी जोशी - जोरदार टाल्या अनिकेत साठी.....आणि वैशाली साठी पण पुन्हा एकदा जोरदार टाल्या......
    हृदयनाथ मंगेशकर - जोशी साहेब ..छान झाला ब्लॉग ....सगले शब्द वगैरे नीट जुलवले तुम्ही ..आता भाषेचा तर काही बोलायचा प्रश्नच नहीं ..तुम्ही अगदी योग्य वापरालित... मला आठवतय २००८ मधे दुसाद साहेबांनी (अन्या ...कानाला हात लाव दोन्ही)ब्लॉग ची सुरुवात केली होती .. मी आणि दुसाद साहेब त्यावेळी एकाच फ्लैट मधे रहत होतो.... दुसाद साहेबांचे ब्लॉग बद्दल म्हणले जायचे की उनके ब्लॉग ....उनके ब्लॉग...उनके ब्लॉग तो पत्थर को भी आसू बहाने पे मजबूर करते है...(वरील ओल चांगल्या अर्थाने घ्यावी ही विनंती)
    पल्लवी जोशी - जोरदार टाल्या अनिकेत साठी.....आणि पंडित जी साठी पण पुन्हा एकदा जोरदार टाल्या......आणि आदरणीय दुसाद साहेबांसठी सुद्धा जोरदार टाल्या.....
    महागुरु - अनिकेत..............(हा लॉन्ग पॉझ आहे).................. तुमचा ब्लॉग तर छानच झाला.....आणि मला कौतुक करावे वाटते ..योगेश च...ब्लॉग लिहिन्यासाठी जे काही विचार तुमच्या मानत चालू होते ..तेव्हा योगेश च तुमच्या सोबत होते ..आणि तुमचा ब्लॉग वाचूनच कलते की ब्लॉग लिहिन्यासाठी आपण म्हणतो न की एक मटेरिअल ..एक दमदार विषय लागतो....तो तुम्ही अगदी सुरेख पद्धतीने सादर केला इथे... छान अगदी छान .... १०० रुपये अन्याला बक्षिस
    आदेश बांदेकर - गप्पा मारायला खुप आवडते पण वेळेची कमतरता आहे ...पुढच्या ब्लॉग साठी पुन्हा आपण भेट्नाराच आहोत ...तोपर्यंत घेउया विश्रांति...एक पेक्षा एक नंबर ब्लॉग मधे..

    हर्षल - अन्या अगदी छान लिहिल आहेस..... एक छोटी गोष्ट आपल्याला मनातल्या किती विचारांना व्यक्त करण्याची संधी देते ह्याच उत्तम उदाहरण......

    ReplyDelete
  2. zakas lihila ahe..ani kharach khup vichar karun apan shevti Niranjan thali ani sujata mastani varch pot bharato!!

    ReplyDelete
  3. jamalay lokanna... or should I say jamlay sadhya mansanna... nemkya shabdat ani halke phulke lihile ahes. sadhya mansanni sadhepanane khup mothya goshti mandlya ahet.

    Nice :) keep writing..

    ReplyDelete
  4. Anya ekdum jam aawdla ki aplyala tuja blog....
    ekdumach mauhol lihilas...bole toh jakkas....

    ReplyDelete
  5. Very well expressed stuff! Way to go Joshi...

    mrinmay

    ReplyDelete
  6. एकदम सही लिहिले आहेस... खूप ओघवाति शैली आहे तुझी लिहिण्याची. अस वाटत की तू स्वत: समोर बसून बोलत आहेस :) खरच साधी माणसा का हविहवीशी वाटतात सगळ्याना हे पुन्हा एकदा नव्याने कळला.
    असाच लिहीत राहा.... तुझ्या ब्लॉग साठी मनापासून शुभेच्छा..... :)

    ReplyDelete